ब्रह्मचारी (नाम)
स्त्रीसंगपरित्यागाचे व्रत आजन्म किंवा काही काळपर्यंत पाळणारा मनुष्य.
लोखंड (नाम)
काळ्या रंगाचा एक धातू ज्यापासून भांडी, यंत्र, हत्यार इत्यादी बनविले जाते.
स्तुतिपाठक (नाम)
राजादिकांची स्तुती करणारा मनुष्य.
हत्ती (नाम)
सोंड असलेला स्थूल व विशालकाय, सस्तन चतुष्पाद.
शाल (नाम)
थंडीत पांघरायचे लोकरीचे वस्त्र.
शांतता (नाम)
मनात राग, क्षोभ नसणे.
नियंत्रण (नाम)
इच्छेनुसार एखाद्या गोष्टीची हालचाल घडण्याची स्थिती.
किरकोळ (विशेषण)
बारीक अंगकाठीचा.
क्षुद्र (विशेषण)
एखाद्या गोष्टीच्या तुलनेत काहीच नाही असा.
लोह (नाम)
काळ्या रंगाचा एक धातू ज्यापासून भांडी, यंत्र, हत्यार इत्यादी बनविले जाते.