अचूक (क्रियाविशेषण)
कोणतीही चूक न करता.
सोंगटी (नाम)
बुद्धिबळाच्या खेळातील बुद्धिबळे.
मान (नाम)
डोके व धड यांना जोडणारा गळ्याचा मागचा व पाठीकडचा बाह्य भाग.
पडसाद (नाम)
दूरच्या अडथड्यावरून परावर्तित होऊन स्पष्टपणे ऐकू येणारा ध्वनी.
सूर्य (नाम)
दिवसाचा प्रकाश निर्माण करणारा आणि पृथ्वीला प्रकाश व ऊब देणारा तारा.
निर्मळ (विशेषण)
ज्यात मळ वा दोष नाही असा.
पिंजरा (नाम)
पक्षी, जनावरे यांना ठेवण्यासाठी लाकूड किंवा धातू यांपासून बनवलेली वस्तू.
गवतकाडी (नाम)
गुरांना खाण्यासाठी दिले जाणारे ओले गवत, वाळलेला कडबा इत्यादी.
सिंह (नाम)
बारा राशींपैकी पाचवी रास ज्यात मघा, पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचे चार चरण व उत्तरा फाल्गुनीचे प्रथम चरण आहे.
साडी (नाम)
स्त्रियांनी नेसायचे लांब,काठपदर असलेले वस्त्र.